
सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश यांच्या बंगल्यात माकडाने उच्छाद मांडल्याने अनेक न्यायाधीश त्रस्त झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने एक टेंडरची नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत ऑनलाइन बोलीची उल्लेख करण्यात आला आहे. यात माकडांना पळवण्यासाठी 100 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. ऑनलाइन बोली यासाठी लावण्यात आली आहे. कारण, इच्छुक एजन्सी आपला प्रस्ताव पोर्टलवर जमा करू शकतील.
नोटिसीत गव्हर्नमेंट ई-मार्पेटप्लेस पोर्टलद्वारे एका नोटिसीत सुप्रीम कोर्टाने म्हटले की, बाजारातून वेंडर आणि एजन्सींना ऑनलाइन बोली लावण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. या एजन्सींजने माकडांना पळवून लावण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱयांची नियुक्ती करावी. हे काम दोन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येईल.




























































