पावसाची गाडी कर्नाटकापर्यंत आली, लवकरच गोव्यात पोहोचणार

1078

मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापल्यानंतर कर्नाटकाकडे मोर्चा वळवला होता. या राज्याचा किनारी प्रदेश व्यापत कारवार, हसनपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता पाऊस गोव्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारपर्यंत म्हणजेच 7 जूनपर्यंत पाऊस कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज आहे.

rain-plastic-cover-kids-mumbai

अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. कमी दाबाच्या पट्ट्याने वाऱ्यांना खेचून आणल्याने केरळमध्ये पाऊस 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. पहिल्याच दिवशी पावसाने केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंबतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता.  निसर्ग वादळ उत्तरेकडे सरकत होतं तेव्हा किनारपट्टीलगतच्या भागात पावसानेही आगेकूच करायला सुरुवात केली होती. गुरुवारपर्यंत म्हणजेच 4 जूनपर्यंत पावसाने केरळ, कोमोरीनचा सर्व भाग  व्यापला होता.

mumbai-cloud-rain-weather

पश्चिम किनारपट्टीभागात पाऊस ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुढे सरकत असला तरी अंतर्गत भागांमध्ये तो पडताना दिसत नाहीये. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर ते क्षीण होईल आणि नंतरच अंतर्गत भागांमध्ये पावसासाठी गरजेचे असलेले वाऱ्याचे प्रवाह हळूहळू सुरळीत होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या