दरवर्षीप्रमाणे सोमवार 10 जूनपासून कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक लागू होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.मान्सून वेळापत्रक 31 ऑक्टोबर पर्यंत लागू रहाणार आहे. कोकणात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो.त्यामुळे रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मुंबईतून कोकणात जाणाऱया
n कोकणकन्या एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 11 वाजता सुटेल ती दुसऱया दिवशी सकाळी 11 वा.40 मिनिटांनी मडगावला पोहचेल.
n जनशताब्दी एक्सप्रेस 5 वा.10 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल ती सायंकाळी साडेचार वाजता मडगावला पोहचेल.
n मांडवी एक्सप्रेस सकाळी 7 वा.10 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल ती रात्री 9 वा.45 मिनिटांनी वाजता मडगावला पोहचेल.
n वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 5 वा.25 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल ती दुपारी साडेतीन वाजता मडगावला पोहचेल.
n तेजस एक्सप्रेस सकाळी 5 वा.50 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल ती सायंकाळी पाच वाजता मडगावला पोहचेल.
n एलटीटी-मडगाव एक्सप्रेस रात्री 12 वा.45 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल ती दुसऱया दिवशी दुपारी दोन वाजता मडगावला पोहचेल. दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस, मंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसच्या आणि तेजस एक्सप्रेस 7 जुलैपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.
कोकणातून मुंबईकडे येणाऱया
n कोकणकन्या एक्सप्रेस मडगाववरून 6 वाजता सुटणार आहे, ती दुसऱया दिवशी सकाळी 5 वा.40 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
n वंदेभारत एक्सप्रेस मडगाववरून साडेबारा वाजता सुटेल ती रात्री 10 वा. 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
n जनशताब्दी एक्सप्रेस 12 वाजता मडगाववरून सुटेल ती रात्री 11 वा.55 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
n मांडवी एक्सप्रेस सकाळी साडे आठला मडगावरून सुटेल ती रात्री 9 वा.45 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
n मडगाव एलटीटी एक्सप्रेस सकाळी साडे अकरा वाजता मडगाव वरून सुटेल ती रात्री 11 वा.35 मिनिटांनी एलटीटीला पोहचेल.
n तेजस एक्सप्रेस मडगाव येथून 12 वा.50 मिनिटांनी सुटेल ती रात्री 12 वा.20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.