
लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येते. याचबरोबर धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी 15 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रति घनमीटर 35.75 रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.