
राज्यभरातील महानगरपालिका व नगरपालिका शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार सुधाकर आडबोले, अभिजित वंजारी, भाई जगताप, राजेश राठोड यांनी शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत लक्षवेधी मांडली होती.