श्री. मोरो विश्वनाथ उर्फ अण्णासाहेब जोशी

351

अमरावतीचे अग्रगण्य वकील श्री. मोरो विश्वनाथ जोशी हे नाटकाचे दर्दी प्रेक्षक म्हणून प्रसिद्ध होते. नागपूर विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी सन्मानपूर्वक प्राप्त केली होती. नाटय़कला आणि कलावंत यांच्याबद्दल त्यांना मनःपूर्वक आस्था होती. नाटक हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे, असे त्यांचे मत होते. नाटकामधील स्त्रियांच्या भूमिका स्त्र्ायांनीच केल्या पाहिजेत, यासाठी ते सतत प्रयत्न करत असत. यासाठी त्यांनी कलावंत स्त्र्ायांना आवाहन केले होते. कालांतराने चांगल्या शिकलेल्या स्त्रियाही नाटकात जातील, अशी मला पूर्ण उमेद आहे, असे त्यांचे म्हणणे होते. 1912 साली अमरावती येथे महालक्ष्मी प्रासादिक संगीत नाटक मंडळींच्या वतीने भरलेल्या आठव्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

आपली प्रतिक्रिया द्या