
नुकताच मूड ऑफ द नेशनने (MOTN) सर्वेक्षण केले होते. यात हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटून पहिला नंबर मिळवला आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या सर्वेक्षणात देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक मिळवला. मात्र फडणवीस यांच्या शेवटच्या स्थानामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. या सर्वेक्षणाने फडणवीस यांच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांच्या नेतृत्व आणि धोरणांवर नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोण कितव्या क्रमांकावर?
१. योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश
२. ममता बनर्जी, पश्चिम बंगाल
३. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेश
४. नीतीश कुमार, बिहार
६. एमके स्टालिन, तामिळनाडू
७. पिनाराई विजयन, केरळ
८. रेवंत रेड्डी, तेलंगणा
९. मोहन यादव, मध्य प्रदेश
१०. हिमंत बिस्वा सरमा, आसाम
११. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र