एमपीएससी परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल

राज्य लोकसेवा आयोगामार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्नासाठी पाच पर्याय उमेदवारांना दिले जाणार आहेत. यापैकी कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक असेल. असे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी 25 टक्के गुण कापले जाणार आहेत. 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू असतील. ‘एमपीएससी’ मार्फत याबाबतची सूचना जाहीर करण्यात आली आहे. आयोगामार्फत उत्तरपत्रिका दोन भागांत विभागण्यात आली आहे. भाग 1 आणि भाग 2 अशी ही उत्तरपत्रिका असेल. भाग 1 हा केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी असून, भाग 2 मध्ये उमेदवाराच्या नावासह बैठक क्रमांक, विषय, सांकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक तसेच स्वाक्षरी असा तपशील असणार आहे.