नो बॉलसाठी भडकलेल्या धोनीची मैदानात घुसून पंचांशी हुज्जत

47

सामना ऑनलाईन, जयपूर

सामना कोणताही असला तरी निर्विकारपणे आणि थंडपणे रणनिती आखत ती पूर्ण करणाऱ्या धोनीचं रौद्ररुप चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स  यांच्यातील IPL सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. चेन्नईचा संघ आव्हानाचा पाठलाग करत असताना अखेरच्या षटकात हा सगळा तमाशा पाहायला मिळाल. पॅव्हेलिअनमधून सामना बघत असलेला धोनी पंचांच्या एका निर्णयामुळे भडकला आणि त्याने थेट मैदानात घुसून पंचांशी हुज्जत घातली. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा चेन्नईच्या संघाला 2 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. कमरेच्यावर  चेंडू असूनही तो पंचांनी नो बॉल दिला नाही. यामुळे आधी फलंदाज रवींद्र जाडेजाने आक्षेप नोंदवत भांडायला सुरुवात केली. त्याच्या मदतीला धोनी धावून आला आणि त्यानेही पंचांशी हुज्जत घातली.

When MS Dhoni lost his cool

Visit IPLT20.com the official IPLT20 website for minute-to-minute LIVE updates.

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या हुज्जतीबद्दल दंड ठोठावण्यात आला असून त्याच्याकडून मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे. बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता आणि मिशेल सँटनर हा फलंदाजी करत होता. 3 चेंडूत 8 धावा हव्या असताना स्टोक्सने सँटनरला कमरेच्यावर चेंडू टाकला. हा चेंडू सँटनरने टोलवत 2 धावा वसूल केल्या. हा चेंडू आधी नो बॉल असल्याचं पंचांनी जाहीर केलं, मात्र नंतर त्यांनी निर्णय बदलला. यामुळे आधी जाडेजा आणि नंतर धोनी वैतागला होता. धोनीने भांडण केल्यानंतरही पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये सँटनरने पाचव्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावा हव्या होत्या. दबावाखाली आलेल्या स्टोक्सने एक वाईट चेंडू टाकला. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 3 धावा हव्या होत्या. सँटनरने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत हा रोमांचक सामना जिंकला.

आपली प्रतिक्रिया द्या