मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक

अहिल्यानगर शहर परिसरातील मुकुंदनगर भागातील दोन कत्तलखान्यांवर भिंगार कॅम्प पोलिसांनी छापे टाकून 880 किलो गोमांस जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

भिंगार कॅम्प पोलिसांनी मुकुंदनगर येथील दर्गादायरा रोडवरील मशिदजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. येथून पोलिसांनी नासीर कुरेशी (वय 50, रा. झेंडीगेट, नगर) याला गोमांस विक्री करताना ताब्यात घेतले. पोलिसांनी तेथे झडती घेऊन 2 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचे 850 किलो गोमांस, 200 रुपये किंमतीचा एक लोखंडी सत्तुर असा एकूण 2 लाख 12 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱया कारवाईत पोलिसांनी मुकुंदनगर येथील बजाज कॉलनी येथे पत्र्याच्या शेडमधील कत्तलखान्यावर छापा टाकून 9 हजार रुपये किमतीचे 30 किलो गोमांस जप्त केले. येथून तन्वीर मोहम्मद कुरेशी (वय 31, रा. जयहिंद बेकरीजवळ, भिंगार) आणि सलीम इक्बाल कुरेशी (वय 20, रा. सदर बझार कसाई गल्ली, भिंगार) यांना ताब्यात घेतले.

मुकुंदनगर येथील दोन छापा टाकला. या कारवाईत नसीर बाबु कुरेशी गोमांस व इतर साहित्यासह भिंगार कत्तलखान्यांवर छापेमारी करत जप्त केलेल्या नासिर कुरेशी, तनवीर कुरेशी, सलीम कुरेशी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अजय गव्हाणे, दीपक शिंदे, रवि टकले, पांडुरंग बारगजे, प्रमोद लहारे, पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

880 Kg Beef Seized from Mukundnagar; Three Arrested

Police seized 880 kg of beef during a raid in Mukundnagar and arrested three individuals in connection with illegal cattle slaughter.

Keywords: Mukundnagar beef seizure, 880 kg beef seized, illegal cow slaughter, beef raid Pune, three arrested beef case, Maharashtra beef ban, Pune police action