
देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्प असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेच्या खर्चात तब्बल 90 हजार कोटींची वाढ झाली आहे.
हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1.08 लाख कोटी रुपयांवरून थेट 1.98 लाख कोटी रुपये म्हणजेच 21.5 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (एमएएचएसआर) कॉरिडोरसाठी आणि बाहेरच्या फंडिंगची आवश्यकता लागणार नाही, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जमीन खरेदी करण्यात उशीर झाल्याने ही कॉस्ट 83 टक्के वाढल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या बजेटमध्ये राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनसाठी 15 हजार कोटी रुपये ठरवण्यात आले आहेत. जे यावर्षीच्या 15 हजार 500 कोटीच्या पॅपिटल खर्च जीबीएसपेक्षा कमी आहेत. रेल्वे अर्थ मंत्रालयाकडे आणखी फंड मागण्याची योजना बनवत आहे. जीआयसीएने 2017 पासून या प्रोजेक्टसाठी 59,396 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. 508 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट जपानच्या मदतीने आणि फंडिंगने बनवला जात आहे.


























































