मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर बसचा अपघात, वृद्ध महिलेचा मृत्यू

मुंबईच्या मलबार हिल भागात सह्याद्री अतिथीगृहासमोर एका बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव नीता शहा आहे. त्या रस्त्याच्या कडेला चालत होत्या. तेव्हा विजय वल्लभ चौकाहून कमला नेहरू पार्ककडे जाणाऱ्या १०५ क्रमांकाच्या मार्गावरील “डाउन” दिशेने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्या आणि अपघात झाला. “बसचालकाला मोठा आवाज ऐकू आला आणि त्याने तात्काळ गाडी थांबवली. खाली उतरून पाहिले तेव्हा एक पादचारी महिला अपघातात सापडल्याचे दिसले.

घटनेच्या वेळी जवळच असलेल्या स्थानिक पोलिसांनी शहा यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.