गोव्यातील दाबोलीम विमानतळावरून मुंबईसाठी निघालेले एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण बुधवारी सकाळी अचानक रोखण्यात आले. त्याचे कारण आता समोर आले आहे. या विमानाला पक्ष्यानं धडक दिल्यानं विमानाचं टेकऑफ रद्द करावं लागलं, अशी माहिती एका अधिकाऱ्यानी दिली.
सकाळी 6.45 वाजता ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
दाबोलिम विमानतळावरून (दक्षिण गोव्यातील) मुंबईला येणारं हे विमान पक्ष्यानं धडकल्यानं धावपट्टीवर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. टेकऑफ रद्द करावं लागल्याची माहिती विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली.
ते म्हणाले, ‘टेक-ऑफ तात्काळ रद्द करण्यात आलं आणि पुढील तपासणीसाठी विमान उभं करण्यात आलं आहे’.