
धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानी पंपनीला मिठागरांच्या जमिनी आंदण दिल्या जात आहेत. याप्रकरणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर स्पष्टीकरण द्या असे न्यायालयाने आज याचिकाकर्त्याला सांगितले.
पेंद्र सरकारने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आणि या जमिनींवर अदानीच्या पंपनीला अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन करण्यास मुभा दिली. मात्र, निव्वळ खासगी विकासकांच्या फायद्यासाठी सरकार मिठागरांच्या जमिनीवर अतिक्रमण करून पर्यावरणाचे नुकसान करत आहेत, अशी जनहित याचिका मुलुंड येथील अॅड. सागर देवरे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.