सात दिवसांत दीड महिन्याचा पाणीसाठा! तलाव क्षेत्रात संततधार!

579

जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे  339067 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून हे पाणी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पुरणारे आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत संततधार सुरू असल्याने केवळ सात दिवसांतच दीड महिन्याला पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

rain-in-village

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही जून कोरडा गेल्याने तलाव कधी भरणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतही जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांत वेगाने पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. ही संततधार अशीच सुरू राहिल्यास लवकरच मुंबईकरांसाठी वर्षभर पुरणारा पाणीसाठा जमा होणार आहे.

असा वाढला पाणीसाठा

सातही तलावांत मिळून 6 जुलै रोजी 160692 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. हा पाणीसाठा दीड महिन्यांना पुरणारा होता.  तर आता 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सातही तलावांत मिळून 339067 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाले आहे. मुंबईला दररोज होणारा 3800 दशलक्ष लिटर पाणी पाहता हे पाणी पुढील तीन महिने म्हणजेच 13 ऑक्टोबरपर्यंत पुरणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या