भाईंदरमधल्या खारफुटी झाडांचे जिथे स्थानांतरण होणार तिथे प्रत्यक्षात जागाच उपलब्ध नाही, आदित्य ठाकरे यांच्याकडून पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्सोवा-भाईंदर जोडरस्त्याच्या प्रकल्पावरून पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विधानसभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारची पोलखोल केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पासाठी सुमारे 45 हजार खारफुटी वनांची कत्तल होणार आहे. तसेच 13 लाख 70 हजार खारफुटी झाडांचे स्थानांतरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी खारफुटी झाडांचे स्थानांतरण होणार असल्याचे सांगितले जात आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्षात जागाच उपलब्ध नाही.”

यामुळे सरकार आणि वनखात्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “जागा नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर खारफुटींचे स्थानांतरण कसे शक्य आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामुळे पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.