भंगार वाहनांच्या विल्हेवाटीसाठी मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रस्त्यांवर टाकाऊ व बेवारस वाहने मोठ्या प्रमाणात उभी आहेत. या भंगार वाहनांमुळे मुंबईत वाहतूक कोंडीचीही समस्या वाढली आहे. त्यामुळे या भंगार वाहनांच्या विल्हेवाटीसाठी राज्य शासन मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी; तसेच महापालिका किंवा राज्य शासनाच्या उपलब्ध जागेवर सुमारे पाच एकर जागेत सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्याचे निर्देश शेलार यांनी दिले.