
मध्य रेल्वे मार्गावर गेल्या पाच महिन्यांत 17 लाख विनातिकीट आणि अनधिकृत प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 100 कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात राखीव डब्यांमध्ये घुसणाऱ्यांचाही समावेश आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक लोकल ट्रेनला गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. याचा उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्यानंतर मध्य रेल्वेने तिकीट तपासणीच्या मोहिमा तीव्र केल्या आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत अयोग्य तिकिटासह तसेच अवैध प्रवास करणाऱ्या 17.19 लाख प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 100.50 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.