
वांद्रे येथील अमेरिकन दूतावासाला बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा फोन आला. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तपासणी केल्यावर तो अफवेचा फोन असल्याचे उघड झाले. घडल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बॉम्बच्या अफवेचे फोन येण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. शनिवारी रात्री अमेरिकन दूतावासात एक फोन आला. दूतावासाच्या कार्यालय परिसरात बॉम्ब स्फोट होणार असल्याचे सांगून फोन कट केला. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) चे पथक घटनास्थळी रवाना झाले. तपासणी केल्यावर काही संशयास्पद आढळून आले नाही. घडल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. धमकीचा फोन करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.