
मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 459.52 कोटी रुपयांचा महसूल मिळवत गेल्या दोन वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. मध्य रेल्वेला ‘भंगारमुक्त’ करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये निरुपयोगी साहित्य केवळ काढून न टाकता, त्यातून महसूल निर्मितीवर भर देण्यात आला.
विविध श्रेणींतील भंगार आणि टाकाऊ साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून 459.52 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. भुसावळ विभाग हा सर्वाधिक कमाई करणारा विभाग ठरला आला आहे. या विभागाने 105.39 कोटींची विक्रमी भंगारविक्री केली आहे. यानंतर माटुंगा कार्यशाळा (68.39 कोटी रुपये), नागपूर विभाग (64.02 कोटी रुपये), मुंबई विभाग (55.49 कोटी रुपये), पुणे विभाग (50 कोटी रुपये) आणि उर्वरित रक्कमेत इतर विभाग व उत्पादन घटकांचा वाटा आहे.




























































