व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसांना अटक

पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाचे 13 लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या दोघांना देवनार पोलिसांनी अटक केली. निसार अहमद उर्फ सलीम शेख आणि संजय दुबे अशी त्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार या महिला व्यावसायिक असून ते वसई येथे राहतात. त्या रूम बघण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांना पोलीस असल्याचे भासवले व पैसे लुटले. गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक कैलास सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक भावना वैद्य, सुरवसे, खोत, जाधव आदींच्या पथकाने निसार आणि संजय दुबेला ताब्यात घेतले.