
आयटी पवई येथे शिकणाऱया नमन अग्रवाल या विद्यार्थ्याने कॅम्पसमधील इमारत क्रमांक 4 येथून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. तो सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
या प्रकाराची माहिती समजताच पवई पोलीस घटनास्थळी गेले. पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. त्या इमारतीचे छत का बंद नव्हते, सुरक्षेमध्ये काही त्रुटी आहेत का, हे तपासण्याचे काम पवई पोलीस करत आहेत. तसेच छतावर कोण जाते हेदेखील तपासण्यासाठी कोणी सुरक्षा रक्षक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.





























































