मालाडमध्ये तोतया पोलिसाला अटक

गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल प्रशासनाची फसवणूक करणाऱ्याला बांगूर नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रकाश ज्ञानदेव जाधव उैर्फ पक्या असे त्याचे नाव आहे. मालाडमधील एका हॉटेलमध्ये गेल्या महिन्यात गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवत आरामासाठी रूम घेतला. हॉटेल कर्मचाऱ्याने त्याच्याकडे ओळखपत्र मागणी केली. तेव्हा त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. हॉटेलचे बिल मागितल्यावर त्याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तेथून काढता पाय घेतला. हॉटेल मालकाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीला अटक केली.