
आरटीओ ई-चलानची एपिके फाईल पाठवून ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून नऊ लाख रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांची केमिकल्स उत्पादनाची कंपनी आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार बँकेचे स्टेटमेंट पाहत होते तेव्हा त्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या खात्यातून 9 लाख 71 हजार रुपये काढल्याचे लक्षात आले. त्याबाबत त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांचा मोबाईल स्कॅन केला तेव्हा त्यांना मोबाईलमध्ये एम कवच 2 हे अॅप दिसले.
त्यांच्या मोबाईलमध्ये आरटीओ ई-चलान एपिके फाईल दिसली. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांना ही फाईल एकाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली होती. घडल्याप्रकरणी त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

























































