
चारकोपच्या आदर्शनगर गेटसमोरील रस्त्याखालील 300 मिमीची मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात होते. मात्र शिवसेना शाखा क्रमांक 20 ला याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला याची माहिती देत जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून घेतली. शिवसैनिकांच्या या कार्यतत्परतेमुळे चारकोपमधील हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
चारकोपमधील आदर्शनगर गेटसमोरील मुख्य जलवाहिनी शनिवारी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते. याबाबतची तक्रार आल्यानंतर शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवले. रविवार सुट्टीच्या दिवशीसुद्धा महापालिकेचे अधिकारी सूरज पवार यांनी तातडीने दाखवून खोदकाम आणि जोडकाम पदकाला घटनास्थळी पाठवले आणि तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. या जलवाहिनीचा वापर आदर्शनगरपासून चारकोप सेक्टर-8 करण्यात येतो. त्यामुळे या परिसरातील सर्वांना याचा फटका बसला असता, मात्र शिवसेनेने कार्यतत्परता दाखवून रहिवाशांना दिलासा दिला. यावेळी उपशाखाप्रमुख गजानन सावंत, संतोष पवार, स्थानिक रहिवासी हनुमंत कदम, राजेश शेट्टी, प्रवीण चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.