
मलबार परिसरात संतापजनक उघडकीस आली आहे. घराबाहेर भावासोबत खेळत असताना गार्डनमध्ये नेत 10 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा भाऊ घराबाहेर खेळत होते. यावेळी आरोपीने त्यांना गार्डनमध्ये घेऊन जातो असे आमिष दाखवत त्यांना सोबत नेले. गार्डनमध्ये गेल्यावर आरोपीने पीडितेच्या भावाला खाऊ आणण्यासाठी दुकानात पाठवले. यानंतर आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्छता केल्यास आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.
मुलगी घरी आल्यानंतर तिने आईला सर्व आपबीती सांगितली. यानंतर मुलीच्या आईने मलबार हिल पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत (BNS) गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.