
वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या 56 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी जीवन संपवले. विक्रोळी परिसरात रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कॉन्स्टेबलने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्नी उठवायला गेली असता कॉन्स्टेबलने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पत्नीला संशय आल्याने तिने पोलिसांना कळवले. यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. चौकशीअंती आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.