
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱया विक्रोळी रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले असून पुढील दोन दिवसांतच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्राr मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. या पुलामुळे प्रवास वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे. पुलाची 565 मीटर उभारणी महानगरपालिकेने आणि उर्वरित 50 मीटरची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे.