पश्चिम  रेल्वेवर ‘कवच’ सुरक्षा प्रणाली, 397 कोटी रुपयांचा निधी मंजूर

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय प्रणालीअंतर्गत ‘कवच’ सुरक्षा कवच शुक्रवारी कार्यान्वित करण्यात आले. विरार ते वडोदरा विभागात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

विरार ते डहाणू हा विभाग मुंबई उपनगरीय विभागांतर्गत येतो. हा प्रकल्प मोठय़ा नागदा-वडोदरा-सुरत-विरार-मुंबई सेंट्रल का@रिडॉरचा एक भाग असून त्यासाठी 397 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने 344 किमी लांबीच्या विरार-सुरत-वडोदरा विभागातील प्रवासी गाडय़ांसाठी ‘कवच आवृत्ती 4.0’ ही स्वदेशी विकसित ट्रेन संरक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे.

शुक्रवारी दुपारी दादर स्थानकातून सुटलेली दादर-भुज सयाजीनगरी एक्स्प्रेस मुंबईहून धावणारी पहिली कवच-सुसज्ज ट्रेन बनली. ‘कवच’ ही ट्रेनची टक्कर रोखणारी आधुनिक सुरक्षा प्रणाली आहे.