नववर्षाच्या स्वागतावेळी 211 तळीराम चालकांविरोधात कारवाई

फाइल फोटो

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केले. मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱया 211 चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 13 हजार 752 जणावर ई चलन करण्यात आले. 2025 साली पोलिसांनी 333, तर 2024 साली पोलिसांनी 229 तळीराम चालकावर कारवाई केल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी तळीराम चालकाची संख्या कमी झाली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त आयुक्त देवेन भारती आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी हे भेटी देऊन पोलिसांना मार्गदर्शन करत होते. बुधवारी सायंकाळपासून ठीक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. पोलिसांनी हजारो दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. हेल्मेटचा वापर न करणे, सिग्नल जंप करणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट, बिनासीटबेल्ट वाहन चालवणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱयाविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 13 हजार 752 जर्णंविरोधात ई-चलननुसार कारवाई केली.