मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, पाच किमी पर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा

मुंबई पुणे महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सलग सुट्ट्या असल्याने मुंबईकरांची पावलं लोणावळाजवळ वळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी निर्माम झाली आहे. पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवशांचा खोळंबा झाला आहे.

मुंबई पुणे महामार्गावर भोर घाटात मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत आहे. अनेक प्रवाशांनी या वाहतूक कोंडीचे व्हिडीओ पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला आहे. काल अक्षय तृतीया आणि आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे सुट्ट्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी लोणावळा गाठलं आहे.