पावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू

301

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे उन्मळून पडलेल्या शेकडो मोठय़ा झाडांची नीट छाटणी, तोडणी करून ते उचलण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून दिवसभर सुरू होते.

पावसामुळे ज्या सखल भागांत पाणी शिरले होते तेथील पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याचे कामही सुरू होते. दरम्यान, विचारे मार्गावरील ताडदेव आरटीओ रेसकोर्सच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील भले मोठे झाड कोसळले होते. त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. परंतु स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी त्वरित दखल घेत ‘डी’ विभागाच्या उद्यान अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने झाडांची योग्य रीतीने छाटणी व तोडणी केली आणि मार्ग वाहतुकीला मोकळा केला.

आपली प्रतिक्रिया द्या