वरवरा राव यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच, हैदराबादला स्थलांतरित होण्याची मागणी फेटाळली; भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण

मुंबईतील राहणीमान आणि भाडे परवडत नसल्याने हैदराबाद येथे स्थलांतरित होण्याची परवानगी मागणाऱया कवी वरवरा राव यांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला. तपास यंत्रणेच्या विरोधानंतर न्यायालयाने वरवरा राव यांची हैदराबाद येथे स्थलांतरित होण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली.

भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले वरवरा राव मुंबईत राहतात. याच प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना ट्रायल सुरू असतानाही मुंबई उच्च न्यायालयाने दिल्ली येथे जाण्याची परवानगी दिल्याने वरवरा राव यांनीदेखील त्याच आधारावर हैदराबाद येथे जाण्याची परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने वरवरा राव यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळून लावला. मुंबईतील भाडे आणि राहणीमान परवड नसल्याने वरवरा राव यांनी यापूर्वीदेखील हैदराबाद येथे जाण्याची परवानगी मागितली होती, मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली होती.