गुणगौरव समारंभ
मुंबई: श्री साईनगर लोकसेवा समिती आणि लायन्स क्लब ऑफ बॉम्बे (वेस्ट) च्या वतीने अंधेरी पूर्व विभागातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मंगळवार 6 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. साईनगर लोकसेवा समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. लायन्स क्लबचे के. एल. परमार, नीलम सेठीया, संस्थेचे अध्यक्ष दीपक सावंत, उपाध्यक्ष श्रद्धानंद जाधव, सरचिटणीस वासुदेव वळवी, खजिनदार गिरीश शेलार उपस्थित राहणार आहेत.
रक्तदान शिबीर
मुंबई: राष्ट्र सेवा दलाच्या मालाड शाखेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे हे 42 वे वर्ष आहे. 15 ऑगस्टला सकाळी 8.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठाणेकर हाऊस, प्रकाश आनंद भुवन, तुरेल पाखाडी, जकेरिया रोड, मालाड पश्चिम येथे होणार आहे. रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. संपर्क – सिद्राम बंडगर 892881112.
श्रावणानिमित्त कार्यक्रम
मुंबई: सांताक्रुझ येथील लिंकिंग रोडवरील आर्य समाज येथे श्रावण कार्यक्रमात भजन-प्रवचनासह पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 16 ते 18 ऑगस्टला होणाऱया कार्यक्रमासाठी नोएडा, जालंधर आणि नवी दिल्लीतून मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी वेदपठणाचा कार्यक्रमही होणार आहे.
पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त शीव-कोळीवाडातील माँ विंध्यवासिनी मित्र मंडळाच्या वतीने बाणगंगा ते विंध्यवासिनी देऊळ जलयात्रा आयोजित करण्यात आली होती. माटुंगा येथील ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष संजय मिश्रा यांनी लाडू, पाणी आणि पुष्पवृष्टी करून जलयात्रेचे स्वागत केले. यावेळी शाखाप्रमुख संदीप चिवटे, शाखा समन्वयक आशीष विलणकर, वंदना अहिरे, विश्वास निमकर, बाळू सिंह, जयश्री भंडारे, मधू गुंडाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.