शेअर बाजारात अच्छे दिन, गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात लागोपाठ सहाव्या दिवशी अच्छे दिन पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स गुरुवारी 142 अंकांनी वधारून 82 हजार अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्ट 33.20 अंकांनी वधारून 25,083 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारातील बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 456.19 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी एका दिवसात 2 हजार कोटी रुपयांची कमाई केली. शेअर बाजारात आज बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये 1.12 टक्के वाढ झाली. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एल अँड टीचे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रीड, इटरनल, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्टस् शेअर्समध्ये घसरण झाली.