
आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 259 अंकांनी वाढून 80,501 अंकांवर बंद झाला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12 अंकांच्या किरकोळ वाढीने 24,346 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सर्वात जास्त वाढ अदानी पोर्टस्च्या शेअर्समध्ये दिसली. बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एसबीआय, मारुती, टाटा मोटर्स, टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही वाढ झाली, तर नेस्ले इंडिया, एनटीपीसी, कोटक बँक, टायटन, पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये घसरण झाली.