मुंबईला मिळाले तीन गुण, पण…तामीळनाडूविरुद्धची लढत ड्रॉ

451

मुंबई आणि तामीळनाडू यांच्यामध्ये येथे सुरू असलेली रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील लढत मंगळवारी ड्रॉ राहिली. ही लढत अनिर्णीत राहिल्यामुळे मुंबईला तीन गुण मिळाले. तामीळनाडूला फक्त एकच गुणावर समाधान मानावे लागले. मुंबईला पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी आगामी लढतींमध्ये निर्णायक विजय मिळवावा लागेल. अन्यथा साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की सर्वाधिक जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईवर ओढवू शकते. मुंबईच्या 488 धावांचा पाठलाग करणाऱ्या तामीळनाडूचा पहिला डाव 324 धावांमध्येच आटोपला. मुंबईच्या शम्स मुलानीने 72 धावांत चार विकेट घेतल्या.

प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन

तामीळनाडूचा पहिला डाव 324 धावांमध्ये गारद झाल्यानंतर मुंबईने त्यांच्यावर फॉलोऑन लादला. तामीळनाडूने चौथ्या दिवसअखेर 1 बाद 48 धावा केल्या. अखेर लढत ड्रॉ राहिली. शशांक अतार्डेने एक फलंदाज बाद केला.

आपली प्रतिक्रिया द्या