ना बिग बजेट, ना कुणी बडे स्टार तरीदेखील आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने 4 कोटी 21 लाख रुपयांची तर दुसऱया दिवशी 7 कोटी 40 लाखांची कमाई केली. तर रविवारी 8 कोटी 43 लाख रुपयांचा गल्ला जमवला. अशाप्रकारे या चित्रपटाने तीन दिवसांत 20 कोटी रुपयांची तगडी कमाई करत आपला आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे. ‘मुंज्या’मध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज यांच्या मुख्य भूमिका आहेत.