मुजफ्फरनगरमध्ये ट्रक-अर्टिगाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक आणि अर्टिगा कार एकमेकांना धडकून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये तितावी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव गाड्यांची एकमेकांना टक्कर बसून हा अपघात झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीच्या चिंधड्या उडाल्या.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरु केले आहे. जखमींना तत्काळी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलिसांनी ट्रक जप्त केला असून त्या  चालकाचा तपास सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. अपघातातील सर्व मृत करनालच्या फरीदपुर येथील आहेत.