
कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. परंतु सध्या पैशाला फार महत्त्व आले आहे. तसेच मुलींच्या आशा-अपेक्षाही आधीच्या तुलनेत जरा जास्त वाढल्याचे दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सांगतोय की, त्याचे लग्न केवळ तो रॅपिडोमध्ये गाडी चालवण्याचे काम करतो, म्हणून मोडले आहे. रॅपिडोमध्ये गाडी चालवून तो महिन्याला 30 ते 40 हजार रुपये पगार कमावतो. परंतु मुलीला रॅपिडो ड्रायव्हरशी लग्न करायचे नाही, असे या मुलाला सांगण्यात आले. हे लग्न मोडल्यानंतर या तरुणाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नासाठी आतापर्यंत दोन ते तीन मुली पाहिल्या आहेत. परंतु, या सर्व मुलींनी रॅपिडोमध्ये काम करतो म्हणून माझ्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. लग्न जमवण्यासाठी हा तरुण आता रॅपिडोची नोकरी सोडणार आहे, असेही त्याने या दोन मिनिटाच्या व्हिडीओत म्हटले आहे.
























































