Myanmar Drone Attack – म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर ड्रोन हल्ला, 200 जणांचा मृत्यू

drone

म्यानमारमधून पळून जाणाच्या प्रयत्नात असणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 200 जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला बांगलादेशच्या सीमेजवळ घडला आहे. नदीच्या किनारी होडीच्या प्रतिक्षेत असलेल्या रोहिंग्यांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. यावेळी लोकांनी प्राण वाचविण्यासाठी थेट नदीत उडी घेतली. यामध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश आहे.

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर झालेल्या हल्ल्यासाठी अराकान सेनेला जबाबदार धरले आहे. या हल्ल्याची पुष्टी झाल्यास म्यानमारमध्ये भयंकर पडसाद उमटतील. हा नागरिकांशी जोडलेला मोठा हल्ला असेल. मात्र अराकान आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. म्यानमारमध्ये ड्रोन हल्ल्यानंतर मृतदेहांचे ढिग पाहायला मिळाले आहेत.  एवढ्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न उभा राहिला आहे.

म्यानमारमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रवास करण्याची परवानगी नाही आणि ही बोट बांग्लादेशात जात होती. 2021 पासून म्यानमारमध्ये आँग सान स्यू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून लष्कराने सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून येथे संघर्ष सुरू आहे.