नगर शहरातील मुकुंद नगर परिसरामध्ये राहणाऱ्या चार वर्षे मुलाचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
मुकुंद नगर परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमाराला इमरान शेख यांचा चार वर्षाचा मुलगा समर शेख हा खेळत होता. तेव्हा शेजारी असलेल्या शादाब किराणा स्टोअर या दुकानाच्या समोर उघडा असलेल्या हौदामध्ये जाऊन खेळताना समर पडला. समर पडल्यानंतर चार तास तो कुठे होता काय होता हे कोणालाच माहीत नव्हते. त्याचा सगळीकडे शोध घेतला असता तो सापडूला नाही.
नगर शहरातील मुकुंद नगर परिसरामध्ये राहणाऱ्या चार वर्षे मुलाचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.https://t.co/EZ1tXx2ale pic.twitter.com/rKuQvA5xIi
— Saamana (@SaamanaOnline) August 5, 2024
काही जणांचे लक्ष त्या हौदाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो त्या हैदात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ भिंगार कॅम्प पोलिसांना व महानगरपालिकेला याची माहिती देण्यात आली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी दाखल झाले आणि चिमुल्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शादबा किराणा स्टोअर चे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.