
राज्यात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. 247 नगर परिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. या आरक्षणाच्या सोडतीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या दोन प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी या दोन प्रतिनिधींची शिफारस करावी, असे नगरविकास विभागाने सर्व पक्षांना कळवले आहे.