माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण

माओवादी- नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनूसह 60 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. शिवाय ते सोबत 50 हत्यारही घेऊन आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध राज्यात भूपतीवर 10 कोटींचे इनाम भूपतीने सशस्त्र संघर्ष संपवून संवादाचाच पर्याय असल्याचे छत्तीसगड सरकारला पत्र लिहीले होते. त्यांच्या या भूमिकेला काही नेत्यांनी विरोध केला. तर माओवाद्यांच्या दुसऱ्या संघटनेच्या नेत्यांनी पत्र पाठवून भूपतीची भूमिका ही त्याचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले, त्यानंतर सोनू पोलिसांच्या संपर्कात असून तो लवकरच आत्मसमर्पण करेल असे सांगितले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने आत्मसमर्पणाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. माओवाद्यांचा म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनूने आज महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्ये 60 माओवाद्यांनी हत्यार टाकत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. माओवाद्यांसाठी हा मोठा झटका आहे.