नागपूर सुयोग पत्रकार निवास फक्त विधिमंडळ पत्रकारांसाठी

सुयोग निवासस्थानाचा वापर फक्त विधिमंडळ पत्रकारांसाठी असावा व अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिली.

सुयोग पत्रकार निवासस्थानी आज विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि नीलम गोऱहे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होत असल्याने पत्रकारांच्या निवास व इतर सोयीसुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दय़ांचा गांभीर्याने विचार करून निवासस्थानातील व्यवस्थापन, प्रवेशप्रक्रिया तसेच शाखांच्या समन्वयाबाबत उद्भवणाऱ्या गैरसमजांना तातडीने दूर करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. गोऱहे यांनी सांगितले.यावेळी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, शिवदर्शन साठे आणि विधान भवन जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने उपस्थित होते. तसेच मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, ज्येष्ठ पत्रकार यदुनाथ जोशी आदी उपस्थित होते.