स्व.विमल मुंदडाच्या सूनबाईंनी कमाल केली, वाचा सविस्तर बातमी

2458

माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ.विमल मुंदडा यांची सून नमिता अक्षय मुंदडा यांनी कमाल केली आहे. नमिता यांनी  पॅरीस येथील ‘एकोल देस पॉन्ट्स पॅरीस टेक’ विद्यापीठातून वास्तू विशारद (आर्किटेक्ट) अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. भारतातून नमिता मुंदडा यांच्यासह फक्त दोन विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले होते. प्रत्येक महिन्यातील किमान सात दिवस विद्यापीठात राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यामुळे मतदार संघात संपर्कात नमिता यांनी गरजेचे होते. नमिता मुंदडा यांनी दोन्ही आव्हाने लीलया पूर्ण केली. मतदार संघातील संपर्क कमी न होऊ देता प्रत्येक महिन्यात पॅरीस येथे सात दिवस देऊन त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमात विद्यापीठातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या तिघांमध्ये नमिता यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या