मोदी-शहांसाठी महाराष्ट्र म्हणजे ATM , नाना पटोले यांची टीका

महायुतीत अद्याप जागावाटप झालेले नाही. अजूनही महायुतीत अनेक घोळ आहेत असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. तसेच महायुतीचे सरकार नसून महाभ्रष्ट सरकार आहे आणि हे सरकार घालवणं आमची जबाबदारी आहे असेही पटोले म्हणाले.

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मोदी शहा यांच्यासाठी महाराष्ट्र हा एटीएम झाला आहे. इथून ते पैसे लुटतात आणि गुजरातला घेऊन जातात. हे महायुतीचे सरकार नसून महाभ्रष्ट सरकार आहे आणि हे सरकार घालवणं आमची जबाबदारी आहे. महायुतीत महाभारत सुरू आहे. महायुतीत अद्याप जागावाटप झालेले नाही. अजूनही महायुतीत अनेक घोळ आहेत. चार नोव्हेंबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल असेही पटोले यांनी नमूद केले.