
जगातील अव्वल टेनिसपटू नाओमी ओसाकाला डाव्या पायाच्या दुखापतीमुळे ‘जपान ओपन टेनिस स्पर्धे’च्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्यावी लागली आहे. तिच्या माघारीमुळे रोमानियाच्या जॅकलीन क्रिस्टियनला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे.
ओसाकाने दुसऱया फेरीत झालेल्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ती पूर्ण तंदुरुस्त होऊ शकली नाही. त्यामुळे सामन्यापूर्वीच माघार घेण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. स्पर्धेत ओसाकाने वाकाना सोनोबे आणि सुझान लेमेन्स यांचा पराभव करून दमदार सुरुवात केली होती.