मोदी पुन्हा अमेरिका दौऱ्यावर जाणार!

वारंवार परदेश दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. मोदी यांचा हा दौरा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात होऊ शकतो, असे एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मोदी ट्रम्प यांची भेट घेतील. तसेच 26 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मोदींचे भाषण होणार आहे.