
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी (यूएनजीए) अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडला. या संकटाचा सामना कसा करणार असा प्रश्न उभा ठाकलेला असताना मोदी-ट्रम्प यांच्या संभाव्य भेटीत काय वाटाघाटी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेची शिखर परिषद सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे होणार आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या शिखर परिषदेला जगभरातील प्रमुख नेते उपस्थित राहतील. यासाठी पंतप्रधान मोदीही अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
व्यापार युद्ध टळले! अमेरिका आणि चीन यांच्यात 90 दिवसांसाठी टॅरिफ सवलत करार वाढला
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा अमेरिका दौरा केला. ट्रम्प आणि मोदींमध्येही मैत्रीचे नाते तयार झाले. मोदींनी ट्रम्प यांचा प्रचारही केला होता. मात्र दुसऱ्या कार्यकाळात यात कटुता निर्माण होताना दिसत आहे.
ट्रम्प यांनी अनेकदा मोदींचा उल्लेख मित्र असा केला, मात्र तरीही अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला. एवढेच नाही तर हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले असा दावाही अनेकदा ट्रम्प यांनी केला. तसेच पाकिस्तानची दाढी कुरवाळण्याचे कामही ट्रम्प प्रशासनाने केले. त्यामुळे आता मोदी-ट्रम्प भेटीमध्ये काय चर्चा होते आणि टॅरिफ सारख्या मुद्द्यावर काय तोडगा निघतो याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने सुरुवातीला हिंदुस्थानी वस्तुंवर 25 टक्के टॅरिफ लावला होता आणि पुढे तो 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. अमेरिकेने लादलेले 25 टक्के आयात शुक्लाची अंमलबजावणी 7 ऑगस्टपासून सुरू झाली असून उर्वरित शुक्ल 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
मोठी किंमत चुकवावी लागेल, पण…! ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला पंतप्रधान मोदींचे उत्तर